आयुष्यमान उंचावण्यासाठी निसर्गाला समृद्ध करा-टाकसाळे

'माझा गाव सुंदर गाव' उपक्रमांतर्गत प्लास्टिक गोळा करणे व नागरिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आयुष्यमान उंचावण्यासाठी निसर्गाला समृद्ध करा-टाकसाळे

विजय कुलकर्णी/परभणी : मानवाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रदूषण आणि प्लास्टिकला हद्दपार करून निसर्गाला अधिक समृद्ध करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलं. आज पूर्णा तालुक्यातील गौर या ग्रामपंचायतीमध्ये शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'माझा गाव सुंदर गाव' उपक्रमांतर्गत प्लास्टिक गोळा करणे व नागरिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी टाकसाळे यांच्या उपस्थितीत गावातील परिसरात असलेले प्लास्टिक गोळा करण्यात आले, वृक्ष लागवड करण्यात आली, शाळेतील हँडवॉश आणि शेडची पाहणी करण्यात आली, कोरोना काळात चांगले काम केलेल्या आशाताई, अंगणवाडीताईचा सन्मान करण्यात आला.

गावातील नागरिकांशी संवाद साधतांना टाकसाळे म्हणाले की, गाव परिसर स्वच्छतेबरोबर आपलं मन देखील स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे, प्लास्टिकच्या अतिवापरामुळे मानवा बरोबर निसर्गाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्लास्टिक गावातून हद्दपार करावे तसेच गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. शेतातील जीव-जंतू पशुपक्षी हेदेखील मानवी जीवनाचा भाग आहेत म्हणून त्यांचेही संगोपन करणे आपले कर्तव्य आहे. तरुणांनी व्यसन सोडून गाव स्वच्छतेमध्ये सहभाग नोंदवावा आणि खेड्यापाड्यातील महिलांनी स्वतःच्या सन्मानासाठी शौचालयाचा नियमित वापर करण्याचे आवाहन यावेळी शिवानंद टाकसाळे यांनी केले. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके,गट विकास अधिकारी अमित राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, गट शिक्षणाधिकारी साबळे,अनंत पारवे, ग्रामविकास अधिकारी श्रीमती लाडेकर, विस्तार अधिकारी साहेबराव सूरेवाड, तालुक्यातील ग्रामसेवक आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.