एम.एस.हुलसूरकर/हुलसूर : कोरोनाने पुन्हा डोके वर काढलं आहे. काही भागात लाँकडाउन होण्याची चिन्ह दिसत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांना पुन्हा गावाकडे येण्याची ओढ लागली आहे. खबदारीचा उपाय म्हणुन कर्नाटक सरकारने महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर कडक बंदोबस्त लावला आहे.
महाराष्ट्रातुन मुंबई,पुणे येथील प्रवासी कर्नाटकात येत असतील तर त्यांच्याकडे कोव्हिड निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सीमेवरती प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्यात येत आहे. जर कोणी प्रवाशी पॉिझिटिव्ह आढळला तर त्यांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहिती हुलसूर तहसीलदार शिवानंद म्हेत्रे, नायबतहसिलदार संजुकुमार बहिरे, गिरदावर मैनेश स्वामी डॉ बिरादार, डॉ संतोष व पोलीस शिबंदी यांनी दिली.