प्लास्टिकच्या अति वापरामुळे मानवी आरोग्याचा ऱ्हास-शिवानंद टाकसाळे

प्लास्टिक गोळा करण्याच्या मोहिमेला परभणीत उस्फूर्त प्रतिसाद

प्लास्टिकच्या अति वापरामुळे मानवी आरोग्याचा ऱ्हास-शिवानंद टाकसाळे

विजय कुलकर्णी/परभणीः पूर्वीच्या काळी शेणा मातीच्या वस्तु असल्याने प्लास्टिकचा वापर दिसायचा नाही. परंतु आजच्या परिस्थितीत विचार केला तर प्लास्टिकचेच जाळे दिसत आहे. यामुळे पर्यावरणाचा आणि मानवी आरोग्याचा मोठा ऱ्हास होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावे आणि खेडोपाडी स्वच्छतेची संस्कृती रुजावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.

प्लास्टिक कचरा गोळा करण्याच्या मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक २१ आणि २६ जानेवारी या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक गोळा करण्याची मोहीम राबविण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी आवाहन केले आहे. या मोहिमेला जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्लास्टिक गोळा करून प्रतिसाद नोंदवला. दिनांक २१ जानेवारी रोजी शिवानंद टाकसाळे यांनी परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अधिकारी आणि गावकऱ्यांच्या सहका-याने गावातील स्वतः प्लास्टिक कचरा गोळा करून जिल्ह्यातील नागरिकांना प्लास्टिक बंदीचा संदेश दिला.

यावेळी टाकसाळे यांनी उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, पूर्वीच्या काळी शेणा मातीचा खत खड्ड्यांमध्ये दिसायचा तेव्हा प्लास्टिकचा वापर दिसायचा नाही. परंतु आजच्या परिस्थितीत विचार केला तर त्या खड्ड्यामध्ये फक्त प्लास्टिकचेच जाळे दिसत आहे. यामुळे पर्यावरणाचा आणि मानवी आरोग्याचा मोठा ऱ्हास होत आहे जाम, सिताफळ, लिंब, बोर, अशी फळांची झाडे प्लास्टिक वर कधीच येत नाहीत हे आपल्याला माहिती आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आणि वेळोवेळी ग्रामीण भागात प्लास्टिक गोळा करण्याची मोहिम वेळोवेळी राबविण्या बाबत यावेळी शिवानंद टाकसाळे यांनी प्रतिपादन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, राजेश देशमुख ज्ञानेश्वर सामाले, दशरथ सामाले, सदाशिव देशमुख, टी. एम. सामाले, शिवाजी देशमुख, विनायक सामाले यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालासाहेब उगले तर आभार प्रभाकर जयस्वाल यांनी मानले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.