बनावट मतदार कार्ड बनविणा-या टोळीचा पर्दाफाश

गजानन कॉलनीतील, मातोश्री डिजीटल या दुकानावर छापा, दोन आरोपी ताब्यात...

बनावट मतदार कार्ड बनविणा-या टोळीचा पर्दाफाश

सुमित दंडुके/औरंगाबाद : बनावट मतदार कार्ड बनवून निवडणूक आयोगाची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना पकडण्यात पुंडलीकनगर पोलीस आणि महसुलच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. आरोपींकडून संगणक, प्रिंटर, आणि मोबाईल असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हरीश धुराजी वाघमारे (वय.२२, रा.गजानन कॉलनी) आणि नवनाथ भक्तदास शिंदे (वय.२६) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन कॉलनीतील मातोश्री डिजीटल या दुकानात बनावट मतदार कार्ड तयार केले जातात. अशी माहिती पोलिसांना मिळाली, यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांसोबत जाऊन सापळा लावला, या दुकानावर बनावट ग्राहक पाठवला व मतदार कार्ड बनवून देता का? अशी विचारणा केली. ग्राहकाने केलेल्या मागणीनुसार आरोपी हरीशने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून माहिती मिळविली. आणि ग्राहकाचे पासपोर्ट साईज फोटो घेऊन बनावट ओळखपत्र तयार केले. यावर निवडणूक विभागाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याची बनावट इलेक्ट्रॉनिक ऑटोमेटिक सही चिकटवली. आणि या मतदार कार्डचे स्मार्ट कार्ड बनवून देण्यासाठी त्याने त्याचा मित्र नवनाथ शिंदे याच्या महा ई-सेवा केंद्राच्या ई-मेलवर पाठविले.
गुह्याची खात्री होताच पोलिसांनी तेथील साहित्य जप्त केले आणि आरोपीसह महा ई-सेवा केंद्रावर धाड टाकली. आणि ३९ हजार २०० रुपयांचे साहित्य जप्त केले.

सदरील कारवाई तहसीलदार शंकर लाड, नायब तहसीलदार रेवणनाथ ताठे, पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे सपोनि घनश्याम सोनावणे, उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनावणे आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.