निलंगा : गेल्या दोन दिवसापासून वातावरणात अचानक बदल होऊन थंडीची लाट निर्माण झाली होती. परंतु या थंडीलाही न जुमानता मराठी सिनेकलाकार भरत जाधव यांच्या वर्ल्ड रेकॉर्ड सही रे सही या नाटकास निलंगा नगरीमध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.शिवजयंती निमित्त १९ फेब्रुवारी रोजी रात्री सातच्या सुमारास घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद केंद्रे हे होते.
पुन्हा सही रे सही या नाटकाचे द्विप्रज्वलन सुशीलादेवी शिवाजीराव पाटील निलंगेकर,मा.खा.रूपाताई पाटील निलंगेकर, गोविंद केंद्रे,अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख उपस्थिती नानासाहेब जावळे-पाटील,महाराष्ट्र शिक्षण समितीचे कार्यकारी अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर,दगडू सोळुंके अदी मान्यवर उपस्थिती होते.
अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले, गेल्या तीन वर्षापासून शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. या वर्षीच्या कोरोना मुळे मिरवणूक काढता आली नाही.मात्र शिवभक्ताची निराशा होवू नये म्हणून अवधूत गुप्ते चा शिवगर्जना व भरत जाधव यांच्या सही रे सही हे मराठी नाटकाचे आयोजन केले.सर्व नियमांचे पालन करून हे कार्यक्रम साजरे करण्यात आला.त्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र च्या जिल्ह्यातून रसिकांनी उपस्थिती लावली व यांच्यासह सर्वांचे आभार मानले.तसेच मला आमदार खासदार होण्यासाठी हा कार्यक्रम घेतला नसून तो निलंगेकरांच्या प्रेमाखातर घेतला आहे.पुढील काळातही असे एकाहून एक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातील तुमचे प्रेम आणि आशीर्वाद फक्त पाठीशी ठेवा. शेवटी या जमलेल्या शिवभक्ततासमोर नतमस्तक होऊन आपलं प्रेम असेच राहो अशी आर्तहाक यावेळी अरविंद पाटील निलंगेकर यांनी जमलेल्या रसिकांना भावनिक साद दिली.
यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे उपनगराध्यक्ष मनोज कोळे. डॉ लालासाहेब देशमुख, डॉ किरण बाहेती, दत्ता शाहीर, इरफान सय्यद, शाहूराज थेटे ,किशोर जाधव, शेषराव ममाळे, माजी नगराध्यक्ष वीरभद्र स्वामी, किशोर लंगोटे, पाशा मिया आत्तार, ज्ञानेश्वर बरमदे, संतोष बरमदे, विनोद सोनवणे, जाकीर शेख, अरविंद चव्हाण, पिंटू पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, विकास आकडे, शरद पेठकर, माधव फट्टे,आशिष अटल, अंबादास जाधव ,सुधाकर धुमाळ, पांडुरंग तोष्णीवाल, शाहूराज पाटील,संतोष लांबोटकर,सुमीत ईनानी,महेश ढगे,अजय जाधव,विजय वडणे,राम लोंढे, अब्बू सय्यद,लक्ष्मीकांत सोमाणी, दिलीप मनियार,परीश्रम घेतले.तर सूत्रसंचालन सतीश हानेगावे यांनी केले