व्हॉट्सअपला स्टेट्स ठेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सुसाईड नोटचे व्हॉट्सअपला स्टेट्स ठेऊन त्याने विषारी द्रव्य प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवली....

व्हॉट्सअपला स्टेट्स ठेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सिद्धेश्वर गिरी / सोनपेठ : राज्यातील शेतक-यांचे आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. तालुक्यातील
तिवठाणा या गावातील चंद्रकांत उर्फ मुंजाजी भगवान धोंडगे (३०) या शेतक-य़ाने कर्जफेडीच्या धमक्यांना कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धोंडगे यांच्या आत्महत्येने तिवठाणा गावामध्ये खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे सुसाईड नोटचे व्हॉट्सअपला स्टेट्स ठेऊन त्याने विषारी द्रव्य प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवली.

चंद्रकांत उर्फ मुंजाजी भगवान धोंडगे हा सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा येथील रहिवासी आहे. मंगळवारी दुपारी १२:२३ वाजेच्या सुमारास व्हॉट्सअपला स्टेट्सवर त्यांने लिहिले होते की, 'मी शेतात आहे, माझी उद्या सकाळी माती आहे.सर्वांनी यावे मला पैश्यामुळे धमक्या येत आहेत. म्हणून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मुलांचा सांभाळ करावा, पैश्यामुळे मला त्रास झाला.' असा मजकूर असलेल्या चिठ्यांचे फोटो स्टेट्सवर ठेवले.यानंतर त्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन केले.

चंद्रकांत याने व्हॉट्सअप स्टेट्सवर ठेवलेल्या माहिती त्याचे चुलते हनुमान गणपतराव धोंडगे यांना मिळताच त्यांनी शेतात धाव घेतली. अत्यवस्थ चंद्रकांतला त्यांनी दुपारी १:३५ वाजता गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती मुंडे यांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. त्याच्या पश्चात पत्नी सहा वर्षीय मुलगा, दोन वर्षीय मुलगी, एक भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे.

गंगाखेड पोलीस ठाण्याचे जमादार एम.जी.सावंत,जमादार गोविंद मुरकुटे यांनी शवविच्छेदनापूर्वी पंचनामा केला. याची कागदपत्रे सोनपेठ पोलीसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान गावातील चर्चेतून खाजगी सावकाराने लावलेला पैशासाठी तगादा आणि यातून डोळ्यासमोर पैसे कसे फेडावे हा प्रश्न यातूनच ही आत्महत्या झाल्याची चर्चा होत आहे. आता पोलीस तपासातून योग्य तपास होईलच मात्र ग्रामीण भागात अवैध सावकारी बळावली असून तालुका निंबधक कार्यालयाने अशा घडणाऱ्या घटनातून बोध घेऊन नियमबाह्य सावकारी करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.