विजय कुलकर्णी/परभणी : दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी परभणीतील शेतकऱ्यांच्या सुकाणु समितीच्या वतीने ६ फेब्रुवारी रोजी पोखर्णी नृ.रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन परभणी सुकाणू समितीचे निमंत्रक कॉ.विलास बाबर यांनी केले आहे. मागील ७१ दिवसांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांशी व नेतृत्वाशी संवादातून प्रश्न मार्गी काढणे हे सरकारचेच कर्तव्य आहे. परंतु तसे न करता शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी ताराची कुंपणे उभारली, खंदक खोदणे, खिळे बसवणे हे सरकारचे निर्लज्जपणाचे लक्षणं शेतकरी खपवून घेणार नाहीत. हा इशारा देण्यासाठी रास्ता रोको केला जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकरी उद्या रस्त्यावर उतरून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करणार असल्याचे सुकाणु समितीच्या वतीने सांगण्यात येत आहे.