पोलीस अधिका-यावर जीवघेणा हल्ला

औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्यावर जीवघेणा हल्ला...

पोलीस अधिका-यावर जीवघेणा हल्ला

सुमित दंडुके / औरंगाबाद : वैजापूरच्या शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या अंगावर वाहन घालून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हा प्रकार शहरातील सिडको चौकात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे. सत्यजित ताईतवाले यांच्यावर मुकुंदवाडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
taitwalw

मिळालेल्या माहितीनूसार, ताईतवाले हे कुटुंबासोबत औरंगाबाद येथे राहतात. सोमवारी एका हॉटेलमध्ये गेले असता तिथे काही लोकांसोबत ताईतवाले यांचे भांडण झाले. यानंतर ते सिडको भागात गेले असता सहा हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत वाहन त्यांच्या अंगावर घातले. यात ते खाली पडले. यानंतर सहा जणांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.