वाशिमः पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी येथे आले असता. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राज्यात कोरोनाचे संकट वाढत असताना गर्दी टाळावी, कोरोना संसर्ग वाढणार नाही याची योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र त्यांच्या या आव्हानाला न जुमानता शेकडो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
अशा जबाबदार मंत्र्यांनीच आव्हानाचे पालन केले नाही, तर सामान्य नागरीकांकडून काय अपेक्षा करणार,मंत्री. संजय राठोड पोहरादेवी येथे गेले असता त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. तसेच मास्क देखील न वापरता तेथे उपस्तित होते. यांच्यावर विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी टिका केली.
दरेकर म्हणाले की, एकीकडे मुख्यमंत्री मास्क घाला, असे अवाहन करतात तर दुसरीकडे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत हे गंभीर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.