मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत आझाद मैदानावर शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील विविध पक्ष देखील सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील या मोर्चात सहभागी झाले. यावेळी त्यांनी मोर्चाला संबोधित केलं. पवार म्हणाले की, “मला असं समजलं की राज्यपालांना निवेदन द्यायचं आहे. तुम्हाला ठाऊक आहे की नाही माहित नाही राज्यपाल आज गोव्यात आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात आम्हाला असले राज्यपाल भेटले नाहीत. लाखोंच्या संख्येने शेतकरी आले आहेत. ते राज्यपालांना भेटून फक्त निवेदन देणार होते पण ते गोव्याला गेले आहेत. त्यांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही. त्यांनी कमीत कमी राजभवनात तरी थांबायला हवं होतं. कष्टकरी शेतकऱ्यांचा विचार करायला हवा होता.” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
इतिहासात पहिल्यांदा असे राज्यपाल लाभले : पवार
कंगनाला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही...

Loading...