विजय कुलकर्णी/परभणी: भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांचे रविवारी पहाटे हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुत्यूसमयी ते ५१ वर्षाचे होते.
कारेगाव रस्त्यावरील व्यंकटेश नगरातील निवासस्थानी चाटे यांना मध्यरात्रीच्या सुमारास हदयविकाराचा झटका आला. कुटुंबियांसह मित्र परिवाराने मोठी धावपळ करीत त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केले. परंतू चाटे यांचे उपचारापूर्वीच निधन झाले. त्यांच्या निधनाने कुंटूबियांसह मित्र परिवारास मोठा धक्का बसला आहे. चाटे हे ऐरोनॅटिकल अभियंते होते.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते, प्रखर हिंदूत्ववादी, मोठा मित्र परिवार असलेले, पक्षवर्तूळातही मनमिळाऊ, व अजातशस्त्रू असे व्यक्तीमत्व म्हणून सुपरिचित होते. उत्तम संघटन कौशल्य असणारे चाटे भाजपाचे निष्ठावान नेते, विद्यमान राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या निधनाने सर्वत्र हळहळ होत आहे.