मतदारांना पैसे वाटणारे चार जण ताब्यात

41 हजार रुपये व प्रचार साहित्य जप्त

मतदारांना पैसे वाटणारे चार जण ताब्यात

विजय कुलकर्णी/परभणी: तालुक्यातील झरी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांना पैस वाटणार्‍या चौघांना 41 हजार रुपयांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार दि.15 रोजी मध्यरात्री ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि व्यंकटेश आलेवार, फौजदार चंद्रकांत पवार, विश्वास खोले यांच्यासह कर्मचारी राहुल चिंचाणे, मधुकर चट्टे, बालासाहेब तुपसुंदरे, हरिचंद्र खुपसे, मोबीन शेख, निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, दीपक मुदीराज, अरुण कांबळे हे गुरुवारी रात्री परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे अवैध धंद्यावरील कार्यवाहीसाठी माहिती काढत होते.

त्यावेळी झरी मध्ये मतदारांना पैसे वाटप होत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार हे पथक झरी गावात दाखल झाले. पथकाला काही व्यक्ती पैसे वाटप करत असल्याचे आढळुन आले. पथक आल्याचे कळताच या व्यक्तींनी पळ काढला. कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्यातील एकाला पकडले. त्याचबरोबर तेथील चौघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पथकाने 41 हजार रुपयांसह प्रचाराचे साहित्य जप्त केले.

या प्रकरणी राहूल चिंचाणे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे अंगद मुरकुटे हे करीत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.