जुगार अड्ड्यावर छापा, मुद्देमाल जप्त

६९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त...

जुगार अड्ड्यावर छापा, मुद्देमाल जप्त

विजय कुलकर्णी/परभणी : पूर्णा शहरातील रेल्वे कम्युनिटी हॉलच्या बाजुस झन्ना-मन्ना जुगार खेळणा-या पाच जणांविरूध्द पूर्णा पोलिसांनी छापा टाकुन १८ हजार ४७० रोख रकमेसह एकुण ६९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रेल्वे कम्युनिटी हॉलच्या बाजूस काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती पूर्णा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.पी. चोरमले यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे, कर्मचारी नितीन वडकर, समीर अख्तर पठाण, मंगेश जुक्टे, जाधव, पवार आदींना जुगा-यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. या पथकाने मिळालेल्या माहितीवरून रेल्वे कम्युनिटी हॉल परिसरात छापा टाकला. त्यावेळी तेथे सिध्दार्थ खरे, मोहमद निसार मोदम रौफ, सूर्यकांत जगताप, अजय नरवाडे, अशोक खरे, हे झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पथकाने या सर्वांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली त्यावेळी त्यांच्याजवळील १८ हजार ४७० रुपये जप्त केले. त्याचबरोबर मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण ६९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, या प्रकरणी मंगेश जुक्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कर्मचारी नितीन वडकर हे करीत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.