नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणूमुळे थिएटर आणि मल्टिप्लेक्स बंद झाले होते. त्यामुळे मल्टिप्लेक्स चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.लॉकडाऊन हटवल्यानंतर थिएटर ५० टक्के क्षमतेसह उघडली गेली होती. पण आता थिएटर आणि मल्टिप्लेक्स पूर्णपणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.१ फेब्रुवारीपासून १००% क्षमतेसह मल्टिप्लेक्स देशात चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.तसेच कोविड-१९ शी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल.
जावडेकर म्हणाले की,सरकार अधिकाधिक ऑनलाईन बुकिंगला प्रोत्साहन देत आहे.दोन्ही शो मध्ये काही वेळ अंतर ठेवला जाईल जेणेकरून कोणतीही गर्दी होणार नाही. अलीकडेच गृहमंत्रालयाने सामाजिक अंतर घेऊन थिएटर आणि मल्टिप्लेक्स सुरू करण्याची परवानगी दिली होती. यामध्ये दोन प्रेक्षकांच्या दरम्यान खुर्ची रिक्त ठेवण्याची सक्ती होती. पंरतु सिनेमा हॉल पूर्ण क्षमतेने न उघडल्यामुळे चित्रपट निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित करण्यात रस नव्हता.ज्यामुळे सिनेमा चालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.