जळगाव : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. जळगाव मधील भादाली ग्रामपंचायतीमध्ये तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील विजयी झाल्या आहेत.
अंजली ह्या जळगाव जिह्यातील पहिल्या तृतीयपंथी विजयी उमेदवार ठरल्या आहेत. राज्यातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार असलेल्या अंजली पाटील या जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्र.४ मधुन उभ्या होत्या. ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते विजयापर्यंत त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला.सुरुवातीला त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, त्यांनी यशस्वी लढा देत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यापुढे जाऊन त्यांनी निवडणूकही जिंकून दाखवली आहे.