मुंबई : विधानसभा निवडणुकी पाठोपाठ ग्रामपचांयतीमध्ये मनसेचे इंजिन पुढे सरकलेच नाही. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर ७ ग्रामपंचायतींमध्ये मनसे आघाडीवर होती. मात्र, तेव्हापासून मनसेचे इंजिन पुढे धावलेच नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवण्याचा मनसेचा निर्धार फुसका बार ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
मनसेकडून राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मनसे नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. मात्र, आता ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल पाहता मनसेवर पुन्हा एकदा आत्मपरीक्षणाची वेळ आल्याचे बोलले जात आहे.