हादगांव जि.प. शाळेतील रिक्त पदे तातडीने भरा

अनिल नखाते यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी टाकसाळे यांच्याकडे मागणी, मंजुर १३ पैकी राजपत्रीत मुख्याध्यापकासह ६ पदे रिक्त

हादगांव जि.प. शाळेतील रिक्त पदे तातडीने भरा

विजय कुलकर्णी/परभणी: पाथरी तालुक्यातील हादगांव बु. येथील जि.प. शाळेत १३ पैकी तब्बल ६ पदे रिक्त असुन यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हादगांव बु.येथील जिल्हा परिषद शाळेत ५ वी ते १० पर्यंतच्या माध्यमिक शाळेत विद्यार्थी संख्या चांगली आहे. २७ जानेवारी पासुन नियमीत शाळा सुरू झाल्या आहेत. येथे १३ कर्मचाऱ्यांचा संच मंजुर असला तरी प्रत्यक्षात केवळ ७ कर्मचारी कार्यरत असुन ६ पदे रिक्त आहेत. राजपत्रित मुख्याध्यापकांचे पदही रिक्त आहे. तर माध्यमिक शिक्षक २, प्राथमिक पदवीधर १, परिचर २ अशी पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगोदरच ७ महिने शाळा बंद होत्या. तर ऑनलाईन प्रक्रियाही सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहचली नाही. अनलॉक प्रक्रियेनंतर ५ वी ते १० पर्यंतचे वर्ग नियमितपणे सुरू झाले आहेत. मात्र येथील निम्मी पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडे रिक्त पदे भरण्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन मागणी केली आहे. यावेळी ओमप्रकाश नखाते, रामचंद्र नखाते, महाविर गोंगे आदींची उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.