पाकिस्तान जेलमधुन हसिना औरंगाबादेत

१८ वर्षानंतर हसिना बेगम भारतात...

पाकिस्तान जेलमधुन हसिना औरंगाबादेत

औरंगाबाद : १८ वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेल्या औरंगाबादच्या हसीना बेगम औरंगाबादेत परतल्या आहेत. ६५ वर्षीय हसीना बेगम १८ वर्ष पाकिस्तान जेलमध्ये कैद होत्या. हसीना बेगम १८ वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. परंतु पासपोर्ट हरवल्याने त्यांना भारतात परतता आले नाही. त्यांना पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद करण्यात आले होते.

हसीना बेगम ह्या औरंगाबादच्या रशीदपूरा भागातील आहेत. हा भाग सिटी चौक पोलीस ठाणे अंतर्गत येतो.
त्यांचा विवाह दिलशाद अहमद यांच्याशी झाला होता. जे की उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. हसीना यांनी पाकिस्तानमधील न्यायालयात विंनंती अर्ज केले होते. 'मी निर्दोष आहे', औरंगाबाद पोलीसांनी पाकिस्तानला माहिती पुरवली. त्यानंतर पाकिस्तानने गेल्या आठवड्यात त्यांची तुरूंगातून सुटका केली,आणि भारतीय अधिकाऱ्यांकडे त्यांना सोपवले. अखेर मंगळवारी त्या औरंगाबादमध्ये पोहचल्या.

मायदेशी परतल्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि औरंगाबाद पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. 'मी अनेक अडचणींचा सामना केला आणि आता मायदेशी परतल्यानंतर मला शांततेची जाणीव झाली आहे. मला वाटतय की मी स्वर्गात आहे. मला पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने कैद करण्यात आले आहे. या प्रकरणात अहवाल सादर करणाऱ्या औरंगाबाद पोलिसांचे मी आभार मानते' अशी प्रतिक्रिया त्यांनी भारतात परतल्यावर दिली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.