मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेत इनकमिंक सुरु आहे. भाजपचे नेते सुनील यादव यांनी मनसेमध्ये पक्ष प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला.

सुनील यादव यांच्यासह ५०० उत्तर भारतीयांनी मनसे मध्ये प्रवेश केला आहे. तसेच विरार ठाण्यातील शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला आहे. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसे पक्ष बांधणी करत असल्याचे चित्र आहे.