पतीने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला

पतीला तीन दिवसांची पोलिस कोठडी

पतीने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला

विजय कुलकर्णी/ परभणी : शहरातील वसमत रस्त्यावरील भाग्यलक्ष्मीनगरात पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना काल घडली. गंभीर जखमी असलेल्या पत्नी स्नेहल टाक हिला नांदेडच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

या प्रकरणी नवामोंढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती सुनील टाक यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी (दि.८) न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुनील टाक याचा स्नेहलसोबत विवाह झाला होता. त्यांना दोन अपत्यही असून या पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद होत होते. सततच्या या वादा-वादीमुळे स्नेहल ही मागील दोन-तीन महिन्यांपासून भाग्यलक्ष्मीनगरमध्ये वडीलांच्या घरी रहण्यास आली होती. रविवारी सुनील टाक हा भाग्यलक्ष्मीनगरात शहाणे यांच्या घरी गेला. तेथे रविवारी दुपारी पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. जुन्या भांडणाच्या कारणातून सुनील टाक याने पत्नीवर चाकूने सपासप वार केले. यात पत्नी स्नेहल गंभीर जखमी झाली. तिच्यावर परभणीत प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने नांदेड येथे उपचार-यासाठी हलविण्यात आले. पती सुनील टाक यास नवामोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुमीत सुदर्शन शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून सुनील टाक याने चाकूने वार करत स्नेहल हिला जबर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, सुनील टाक यास सोमवारी नवामोंढा पोलिस ठाण्याचे फौजदार शैलेश जाधव यांनी न्यायालयासमोर सुनील टाक यास हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती फौजदार शैलेश जाधव यांनी दिली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.