शिवजयंती साजरी करायची नाही तर,काय टिपू सुलतानची करणार का?

शिवजयंती साजरी करायची नाही तर,काय टिपू सुलतानची करणार का?

मुंबई : वर्षभरापासून कोरोनामुळे अनेक सण, महोत्सव, यांसह अनेक गर्दी जमवणाऱ्या ठिकाणांवर निर्बंध लावण्यात आलेे होते. येत्या १९ फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या शिवजयंती निमीत्त सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. यात केवळ १०० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी असे सरकारने सांगितले आहे. सरकारच्या या निर्यणा मुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

यावरुन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकरवर निशाणा साधला आहे. शिवजयंती हा आपला वर्षा तील सर्वात मोठा सण. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय. आजान स्पर्धा भरविणारे, बार ची वेळ सारखी वाढवून देणारे, विविध निवडणुकीत कोरोना नियमाची पायमल्ली चालते आणि शिवजयंती ला नियमावली. त्यासोबतच आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतान ची साजरी करणार का? वेळीच हि नियमावली बदला, जनतेला गृहीत धरू नका. असा सवाल नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.