बँक खात्यातील सव्वा लाख लुटले

एटीएम कार्डचे क्लोन तयार करून फसविले

बँक खात्यातील सव्वा लाख लुटले

विजय कुलकर्णी/ परभणी : गंगाखेड येथील एटीएम कार्डची माहिती मिळवून भामट्यांनी एका इसमाच्या बँक खात्यातील १ लाख २० हजार रुपये काढून घेतले आहेत. ही घटना १ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी २७ जानेवारी रोजी गंगाखेड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे.

या संदर्भात अशोक कांदे यांनी फिर्याद दिली.गंगाखेड येथे असताना त्यांनी शहरातील एका एटीएम मधून ५ हजार रुपये काढले. त्यानंतर कांदे पुण्याला गेले. मात्र भामट्यांनी फिर्यादीच्या एटीएम कार्डची माहिती मिळवून कार्डचे क्लोन तयार केले. वेगवेगळ्या दिवशी फिर्यादीच्या बँक खात्यातुन १ लाख २० हजार रुपये काढून घेण्यात आले. पैसे निघाल्याचा संदेश आल्यानंतर फसवणूक झाल्याचे अशोक कांदे यांच्या लक्षात येताच त्यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी घटनेचा पुढील तपास पोनि वसुंधरा बोरगावकर करत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.