विजय कुलकर्णी/परभणी : क्रिकेट प्रेमींसाठी महाकुंभ ठरणारी पाथरी चॅम्पीयन्स लीग शनिवार १३ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता पीपीएल मैदानावर सुरू होणार असुन या स्पर्धेचे उदघाटन आ. बाबाजानी दुर्रांणी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आयोजक माजी नगराध्यक्ष तथा नप गटनेते जुनेदखान दुर्राणी यांनी दिली.
या स्पर्धेत नामवंत बारा निमंत्रित संघ खेळणार आहेत. ही स्पर्धा लेदर बॉलवर खेळवली जाणार आहे. सतरा दिवस चालणा-या या स्पर्धेत एकुण साखळीत ३० सामने होतील, दोन उपांत्य फेरीचे तर १ मार्च रोजी दुपारी १ वाजता या स्पर्धेचा अंतीम सामना होणार आहे. या स्पर्धेत ग्रुप ए मध्ये इक्बाल सिद्धिकी टीम अकॅडमी टीम (ए), यंगबॉईज सीसी जिंतुर, जुनेद दुर्राणी सीसी अंबड, तुलसी सीसी परभणी, रोशनी सीसी पुर्णा, शालिमार सीसी परभणी या सहा संघांचा सहभाग असणार आहे. तर बी गटात नितिन सीसी सेलू, मिलन बॉईज सीसी परभणी, इक्बाल सिद्दिकी क्रिकेट अकॅडमी टीम (बी), एम. के. स्टूडंट सीसी परभणी, जवाहर सीसी परभणी, यासह टी.जे. सीसी जिंतुरचे संघ सहभागी असणार आहेत. या स्पर्धा दोन गटात विभागून प्रत्येक गटाचा सामना दोन सत्रात होणार आहे. दर दिवशी होणारे दोन सामने पहिला सकाळी साडे नऊला सुरू होणार तर दुसरा दुपारी एक वाजता होणार आहे. सामने आयोजनाची संपुर्ण तयारी झाली असून क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वत: जुनेदखान दुर्राणी आणि एक्बाल सिद्दिकी क्रिकेट अकॅडमीची सर्व टीम परिश्रम घेत आहे.