मुंबई :कोरोनाच संकट अजूनही टळलं नसल्याने राज्यातील लॉकडाऊनमध्ये २८ फेब्रुवापरीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कंटेन्मेंट क्षेत्रामध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र सरकारने शुक्रवारी जारी केले.
Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown.#MissionBeginAgain pic.twitter.com/ehsM0rN9Y0
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 29, 2021
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत काही नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली होती. त्यावेळी ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आली होती त्या आताही सुरु राहणार आहेत. पण कंटेन्मेंट झोन क्षेत्रात मात्र लॉकडाऊनचे नियम कायम ठेवण्यात आले आहेत.