रेल्वे कामगारांचे थकीत पीएफ रकमेसाठी बेमुदत धरणे

कंत्राटी पद्धतीने काम करणा-या सफाई कामगार, कॅटरर्स या कामगारांचे गेल्या ९ महिन्यांपासून पीएफची रक्कम जमा करण्यात आलेली नाही...

रेल्वे कामगारांचे थकीत पीएफ रकमेसाठी बेमुदत धरणे

विजय कुलकर्णी/ परभणी : रेल्वे स्थानकात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या सफाई कामगार, कॅटरर्स या कामगारांचे गेल्या ९ महिन्यांपासून पीएफची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. ही रक्कम त्वरीत जमा करावी या प्रमुख मागणीसाठी कामगारांनी आजपासून रेल्वे स्थानकासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

परभणी रेल्वे स्थानकात गेल्या १७ ते १८ वर्षांपासून सफाई व कॅटरिंगचे काम करणारे कामगार कार्यरत आहेत. मात्र संबंधीत कंत्राटदाराने कामगारांचे खाते काढून पीएफची रक्कम कार्यालयात जमा केली नाही. शिवाय काही कामगारांचे गेल्या ९ महिन्यांचे पीएफचे वेतन थकले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कामगारांच्या मागण्यांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी आज पासून कॉ. अॕड. माधुरी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्थानकासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात गंगाबाई साळवे, चतुराबाई गवळी, शोभाबाई कांबळे, लताबाई कांबळे, मुन्नीबाई शेख, मिना गरूड, पवन अवनुर, दत्ता भंडारी, रामजी वाघमारे, साई अवनुर, सुरेश डाके, धम्मपाल मकरंद, राहुल पाईकराव, संदीप भराडे, रत्नशील खिल्लारे आदींसह कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.