बळसोंड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयस्वाल तर उपसरपंच चव्हाण

निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार

बळसोंड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयस्वाल तर उपसरपंच चव्हाण

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली : शहरानजीक असणाऱ्या व ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान सर्वाधिक चर्चेची ग्रामपंचायत ठरलेल्या बळसोंड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शैलेश जयस्वाल यांची तर उपसरपंच पदी ताराबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. बळसोंड ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जलक्रांती पॅनलच्या १३ पैकी १३ जागेवर विजय मिळवून ग्रामपंचायतवर एका हाती सत्ता काबीज केली. जलक्रांती पॅनलचे सर्वेसर्वा पप्पू चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय मिळविल्यानंतर ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडीची प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये शैलेश जयस्वाल यांची सरपंचपदी तर ताराबाई चव्हाण यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. निवडीनंतर आमदार तानाजी मुटकुळे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचा भव्य सत्कार करीत रॅली काढण्यात आली. यावेळी पप्पू भाऊ चव्हाण, आशिष वाजपेयी, शरद जैस्वाल, राजू जयस्वाल, अंकुश जयस्वाल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी सरपंच पद हे केवळ औपचारिकता म्हणून आहे. प्रत्यक्षात सर्व सदस्य हे जनसेवेसाठी कटिबद्ध असून येणाऱ्या काळात निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच शैलेश जयस्वाल यांनी केले. तर ग्रामपंचायत मधील तातडीचा प्रश्न असणाऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल असे प्रतिपादन पॅनल प्रमुख पप्पू चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.