ग्रामपंचायतीवर प्रहार जनशक्ती पक्षाचा झेंडा

सरपंचपदी संगीता पवार तर उपसरपंचपदी अनिल राठोड यांची बिनविरोध निवड...

ग्रामपंचायतीवर प्रहार जनशक्ती पक्षाचा झेंडा

विजय कुलकर्णी/परभणीः पाथरी तालुक्यातील आनंद नगर तांडा या ग्राम पंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदी प्रहार जनशक्ती पक्षाने बाजी मारली असून सरपंचपदी संगीता पवार तर उपसरपंचपदी अनिल राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

एकूण ७ सदस्य संख्या असलेल्या आनंद नगर तांडा ग्राम पंचायत निवडणुकीत पाथरी तालुका प्रमुख युवराज राठोड यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पॅनलने ७ पैकी ५ जागेवर विजय मिळवून निर्विवाद बहुमत सिद्ध केले होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे स्पष्ट बहुमत असल्याने आज सरपंच व उपसरपंच निवडीची फक्त औपचारिकता शिल्लक राहिली होती.

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील विविध पॅनलमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगले यश संपादन केले आहे. अनेक ठिकाणी प्रहार चे उमेदवार विजयी झाले. आनंद नगर तांडा ग्रामपंचायतीच्या यशाद्वारे परभणी जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात प्रहार जनशक्ती पक्षाने चंचुप्रवेश केला आहे. आज या नवनियुक्त सरपंच, उपसरपंचांचा सत्कार प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद पवार, तालुका प्रमुख नारायण ढगे, तालुका प्रमुख युवराज राठोड, पिंटू कदम, अनिल पवार, बाळु नरवाडे, देविदास पवार, सोमनाथ पवार, बाबुराव पवार, धनसिंग पवार, सूर्यकांत राठोड, दत्ता पवार, भारत पवार, नारायण राठोड, कोंडिराम राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.