विजय कुलकर्णी/ परभणी : येथील भूमिपुत्र शहीद जवान बालाजी आंबोरे यांच्या ४था स्मृतिदिनानिमित्त स्मारक समितीच्या वतीने शहीद जवान बालाजी आंबोरे चौकात पोलीस अधिकारी, कर्मचारी, आजी- माजी लोकप्रतिनिधी, शालेय विद्यार्थी, नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य, शहीद जवान बालाजी आंबोरे यांचे वडील आदींनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील भूमिपुत्र शहीद जवान बालाजी आंबोरे यांना ३० जानेवारी २०१७ रोजी वीरमरण आले होते. या वीराला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी रोजी विविध उपक्रम राबवले जातात. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे या सर्व कार्यक्रमाला फाटा देऊन केवळ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सपोनि विजय रामोड, सपोनि वसंत मुळे, पोलीस उपनिरीक्षक सतिश तावडे, भगवानराव आंबोरे, रंगनाथ भोसले, रामनारायण मुंदडा, माणिकराव हजारे, चेअरमन डि.के. आंबोरे, प्रल्हादराव होनमने, गणेशराव गाढवे, नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य मनु आंबोरे, दिपक आंबोरे, पांडुरंग आंबोरे, दिलीप आंबोरे, बबलू माने, खंडेराव वावरे, भगवान लाकडे, शेख इनायततुल्ला, गजानन आळणे, मारोती मोहीते, आदींची उपस्थिती होती. यावेळी राजश्री मगरे या चिमुकल्या बालिकेनी भारत मातेची वेशभूषा धारण करून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहीद जवान बालाजी आंबोरे स्मारक समितीच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.