औरंगाबाद
जीजस कॉल या नावाने ख्रिश्चन धर्मप्रसाराचे काम करणा-या संस्थेचा प्रमुख पॉल दिनाकरनच्या कार्यालय आणि निवासस्थानी आयटी (आयकर) विभागाने छापे टाकले असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. यत तब्बल १२० कोटी रूपयांपेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागली आहे. यात ४ किलो सोन्याचा समावेश आहे.
तामिळनाडू या राज्यातील ख्रिस्ती धर्मप्रसारक पॉल दिनाकरन याच्या कार्यालय आणि निवासस्थानी आयकर विभागाने छापेमारी केली. त्याच्या एकूण २८ ठिकाणावर ही छापे पडली आहेत. त्याच्या जीजस कॉल आणि करूण्या तंत्रज्ञान संस्थाच्या कार्यालयासह जीजस कॉल च्या केंद्रावर देखील छापे पडली आहेत. यात एकुण १२० कोटी रूपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळली आहे.
ज्या संशयास्पद व्यवहाराचा समावेश आहे. त्यात सिंगापूर, ग्रेट ब्रिटन ( इंग्लंड) अमेरिका आणि इस्त्राईल या देशात कंपन्या कांही विश्वस्त संस्था यांची दोनशेहून अधिक बँक खाती आढळून आली आहेत. पॉल दिनाकरनच्या घरातून ४ किलो वजनाचे सोने देखील जप्त करण्यात आले आहे. धर्मप्रसार करण्यासाठी हा निधी गोळा केला जात असावा आणि किंवा त्यातूनच हा पैसा उभारला जात असावा. धर्मप्रसाराच्या सोबतच कांही चमत्काराच्या घटना यामुळे पॉल दिनाकरन वादग्रस्त ठरत आहे. त्यातच आता आयकर विभागाची धाड पडल्याने आणि यात १२० कोटी रूपयांची मालमत्ता सापडल्याने पॉल दिनाकरन यांच्यावरील संशयाचे धुके अधिकच गडद होत चालले आहे.
जीजस कॉलच्या पॉलला आयटीचा कॉल
२८ ठिकाणी छापे, ४ किलो सोने आणि १२० कोटीची बेहिशोबी मालमत्ता असे घबाड सापडले आहे. एका इसाई धर्मप्रसारकाकडे येशू बोलवितो वाल्या बाबावर आता आयकर विभागाची नजर पडली आहे.

Loading...