न्यायाधीश रमले शालेय आठवणीत

३० वर्षापूर्वीच्या अनेक आठवणींना दिला उजाळा

न्यायाधीश रमले शालेय आठवणीत

विजय देशमुख / निटूर : माणूस एकदा मोठ्या पदावर गेला की मागे वळून पाहत नाही अन् तो फारसा संपर्कात ही राहत नाही. मात्र आज ही असे अनेक व्यक्ती आहेत की जे मोठ्या पदावर जरी असले तरी त्यांची ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली असते. अशातलच एक सामान्यातल असामान्य व्यक्तीमत्व म्हणजे न्यायाधीश मुजीब समद शेख (खजूरे) हे होय.

न्यायाधीश मुजीब शेख यांचे निलंगा तालुक्यातल्या निटूरच्या जि.प.शाळेमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे बालपण ही तिथेच गेले. आज जरी आपण मोठ्या पदावर असलो तरी ज्या शाळेने घडवले ज्या गावाने एवढे प्रेम दिले. त्या गावाला व शाळेला भेट देण्यासाठी खास वेळ काढून आल्याचे भोकर जि. नांदेड येथिल जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख (खजूरे) यांनी सांगितले.

न्यायाधीश शेख हे सोमवारी निटूरच्या जि. प. शाळेला भेट देण्यासाठी आले होते. ३० वर्षापूर्वी त्यांचे वडील जि. प. शाळेमध्ये खजूरे गुरूजी या नावाने निटूर मध्ये शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा मुलगा मुजीब ही याच शाळेमध्ये शिक्षण घेत होता.काही वर्षानी बदली झाल्यानंतर हे कुटूंब औसा तालूक्यातल्या लामजना येथे स्थायिक झाले. मात्र नंतर कधी त्यांचा निटूरशी संपर्क आला नाही. मात्र ३० वर्षानंतर स्वतः जिल्हा व सत्र न्यायाधीश पदावर असताना देखील ज्या शाळेत शिकलो ज्या गावात रमलो त्या गावची ओढ लागल्याने न्यायाधीश मुजीब शेख यांनी थेट निटूर गाठून शाळेला भेट दिली.

तसेच ३० वर्षापूर्वीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. गावातील लोकांशी ही मनमोकळ्या गप्पा मारल्या. मुजीब शेख यांनी कोरोना काळात बाहेर राज्यातील पायी चालत जाणाऱ्या नागरीकांची जेवणाची व्यवस्था असो की मोठ मोठे रक्तदान शिबीर घेणे, विस्कटलेल्या संसाराची घडी बसवने. अशे अनेक उपक्रम भोकर व परीसरात न्यायाधीश शेख यांनी राबविले. माणूस किती ही मोठ्या पदावर गेला तरी कर्मभूमीशी प्रामाणिक असावा अस मत शेख यांनी व्यक्त केलं.त्यानंतर शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.