कंगनाची टिवटिव थांबणार

कंगना आता ट्विटरला रामराम करणार...

कंगनाची टिवटिव थांबणार

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कंगना देशातील प्रत्येक घटनेवर आपले मत व्यक्त करतेय. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या नंतर कंगनाचे प्रत्येक ट्विट चर्चेत होते. महाराष्ट्र सरकारसोबतचा तिचा पंगा, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण, तसेच आता शेतकरी आंदोलनावर ती ट्विटरच्या माध्यमातूनच व्यक्त झाली. काही वेळा ती ट्रोलही झाली आहे. परंतु आता कंगनाची ट्विटरवरील ही टिवटिव थांबणार आहे. कंगना आता ट्विटरला रामराम करत असल्याची माहिती तिने ट्वीट करत दिली आहे.

कंगना आपल्या ट्वीट मध्ये म्हणते, "ट्विटर आता तुझा टाईम संपला आहे. आता Koo App वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. मी लवकर कू अॅपवर शिफ्ट होत असून या संदर्भातील माझ् अकाऊंट डिटेल शेअर करेल. स्वदेशी कू अॅपचा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.