विटाच्या सरपंच पदी लताबाई आरबाड तर उपसरपंचपदी...

ग्रामस्थांची वचनपूर्ती करणार:-बाळासाहेब आरबाड

विटाच्या सरपंच पदी लताबाई आरबाड तर उपसरपंचपदी...

सिद्धेश्वर गिरी / सोनपेठ: पाथरी तालुक्यातील विटा (बु.)ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ.लताबाई आत्माराम आरबाड तर उपसरपंचपदी महादेव शंकरराव हारकाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साईराज कुंभार यांनी काम पाहिले होते.तसेच तलाठी मिलिंद विटेकर,ग्रामसेवक संदीप भोसले, नारायण हारकाळ, मदन आरबाड यांची उपस्थित होती.

अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास परिवर्तन पँनलने ९ पैकी ७ जागा जिंकल्या होत्या. सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीसाठी तालुका प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन ८ फेब्रुवारी रोजी निवड करण्यात आली.यात बाळासाहेब आरबाड यांच्या पँनलमधील सरपंचपदासाठी लताबाई आत्माराम आरबाड यांचा तर उपसरपंचपदासाठी महादेव शंकरराव हारकाळ यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले. या निवडीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तीप्पलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.या निवड प्रक्रियेसाठी नारायण हरिबुवा गिरी,चंद्रकला अच्युतराव हारकाळ यांनी अनुपस्थिती लावली होती.तर निवड प्रक्रियेत उत्तम दासीराम हारकाळ,अस्मिता मदनराव देंडगे,गौळण भानुदास तुपसमिंदर,अनिता बाबासाहेब मालसमिंदर,कीस्कींदा भास्कर आरबाड या सदस्यांनी भाग घेतला होता.या निवडीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत परिसरात गर्दी केली होती.यावेळी प्रकाशराव हारकाळ,तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शिवाजीराव हारकाळ,माजी सरपंच उत्तमराव आरबाड,पांडुरंग हारकाळ,बालासाहेब हारकाळ,माजी सरपंच नारायण बदाले,उमेश हारकाळ,सुरेश आरबाड,बळीराम हारकाळ,प्रा.कैलास आरबाड,संजय वाघमारे,राजेश हारकाळ,मदन देंडगे,भास्कर आरबाड,गणेश हारकाळ,पंडीत आरबाड,डी.के.हारकाळ,रमेश हारकाळ,प्रभाकर आरबाड, सुधाकर आरबाड,सुदाम(देवा)आरबाड,माऊली आदत,मुंजाभाऊ आरबाड,अशोक आरबाड,भीमराव आरबाड,दत्तराव आरबाड,अक्षय आरबाड,अमर हारकाळ,विजय आरबाड,माऊली आरबाड,आदींनी नवनियुक्त सरपंच उपसरपंच यांचे स्वागत केले.

ग्रामस्थांची वचनपूर्ती करणार:-बाळासाहेब आरबाड
ग्रामविकास परिवर्तन पँनलच्या माध्यमातून ग्रामस्थांनी आमच्यावर विश्वास दाखवून आमचे हात बळकट करण्यासाठी बळ दिले आहे.आम्ही गावाच्या सर्वांगिन विकासासाठी प्रयत्नशील आहोतच शिवाय ग्रामस्थांची वचनपूर्ती करण्यासाठी वचनबद्ध आहोत.त्यामुळे ग्रामस्थांच्या विश्वासाला तडा जाणार नाही या शब्दाशी बांधील असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड यांनी दिली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.