विजय कुलकर्णी/ परभणी : औरंगाबाद-परभणी महामार्गावरील गणेशपुर-वाघी रोडवर कला रात्री एका चार चाकीमधील वाटसरूना रोडवर बिबट्या बिनधास्त फिरताना आढळून आला आहे. बिबट्याला पहाताच त्यांनी या ठिकाणावरुन पलायन केले.
त्यानंतर त्यांनी ही माहिती परीसरातील नागरिकांना दिली. दरम्यान काही दिवसांपूर्वी जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा-वडी शिवारातील परीसरातील एका शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्याचे पिल्लू विहीरीत आढळून आले होते. दोन दिवसांपूर्वी वाघी येथील शिवारातील माळ रानात वन्य प्राणी रोही यास वाघाने फाडून खाल्ले आहे. आज तर चक्क हा वन्य प्राणी बिबट्या रोडवर फिरताना आढळल्यामुळे शेती पिकांना पाणी देण्यासाठी जाणारे शेतकरी व रोडवरुन प्रवास करणारे नागरिक भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. वनविभागातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन याचा तत्काळ बदोबस्त करावा अशी मागणी परीसरातील नागरिकामधून होत आहे.