अमरावती : राज्यात कोरोना पुन्हा डोकंवर काढताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रदुरभाव लक्षात घेता अमरावती मध्ये उद्यापासुन पुढील ७ दिवसासाठी लाॅकडाऊन लागु करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी दिली आहे.
काय म्हणाल्या यशोमती ठाकुर
“सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना मृत्यू दर हा सध्या १.६ टक्के इतका आहे. आम्हाला नाईलाजाने फक्त जीवानाश्यक वस्तू सुरु ठेवावी लागणार आहेत. अमरावती शहरात पूर्ण कंटेन्मेंट झोन घोषित करुन लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. शहरातील बाजार हे गाईडलाईन्सनुसारच सुरु राहतील”, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.