महामहोपाध्याय डॉ. कमलाकर परळीकर यांना ‘संगीत शिक्षक जीवन गौरव’ पुरस्कार

कै. शिलाबाई जवेरी व कै. शामला माजगावकर या दोन भगिनींच्या नावे व दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या संयुक्त विद्यमाने संगीतातील आजन्म आणि निरलसपणे सेवा करणा-या संगीत शिक्षकाला दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे "संगीत शिक्षक जीवन गौरव" पुरस्कार होय.

महामहोपाध्याय डॉ. कमलाकर परळीकर यांना ‘संगीत शिक्षक जीवन गौरव’ पुरस्कार

विजय कुलकर्णी/ परभणी : मुंबईतील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने या वर्षीचा संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार परभणी येथील संगीत महामहोपाध्याय डॉ. कमलाकर परळीकर यांना प्रदान करण्यात आला. नुकताच पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

या पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात गायिका शमिका भिडे हिच्या सरस्वती स्तुती गायनाने झाली. सुरेश खरे यांनी प्रास्तविक केले. यावेळी शमिका भिडे(सारेगम फेम) हिचा कै. आशालता अवटी यांच्या स्मृती प्रित्यर्थ रोख रु. १० हजार व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर कै.उषा लिमये स्मृती पुरस्कार रोख रु.१० हजार व स्मृतीचिन्ह सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांना देऊन सन्मानित करण्यात आले. कै. शिलाबाई जवेरी व कै. शामला माजगावकर या दोन भगिनींच्या नावे व दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या संयुक्त विद्यमाने संगीतातील आजन्म आणि निरलसपणे सेवा करणा-या संगीत शिक्षकाला दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे "संगीत शिक्षक जीवन गौरव" पुरस्कार होय.

या पुरस्कारासाठी परभणी येथील सुरमणी, महामहोपाध्याय डॉ. कमलाकर परळीकर यांची निवड झाली होती. त्यांना रोख रु. २५ हजार, शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह संस्थाध्यक्ष एन. एच.श्रीखंडे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच रंगभूमीकार कै. मोहन वाघ यांनी त्यांच्या आई कै. सुनंदाबाई वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ रोख रु. १० हजार आणि स्मृतीचिन्ह नाट्य अभिनेत्री वंदना गुप्ते यांना तर कै.उषा लिमये स्मृती पुरस्कार रोख रु. १० हजार व स्मृतीचिन्ह मराठी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.

डॉ.परळीकरांचे अध्यात्मिक गुरु प.पू. रामचंद्र महाराज पारनेरकर, विद्यार्थी सूरज ठाकुर, मुजुमदार या सर्वांनी डाॕ. परळीकरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. परळीकरांनी संगीत प्रसारासाठी पूणे, मुंबईची निवड न करता परभणी शहराची निवड केली हे सांगितले. भारतरत्न भिमसेन जोशी यांनी अमेरिका दौ-यात त्यांची वाद्ये आणि साथीदार दिले, परंतु भिमसेन जोशी, वत्सलाताई व मुली सहित कार्यक्रमाला उपस्थित असल्याची आठवणही सांगितली. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सर्व पदाधीकार्यांचे आभार व्यक्त केले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.