वरपुडकर बोर्डीकरांसह आज अनेकांचे अर्ज दाखल

वरपुडकर बोर्डीकरांसह आज अनेकांचे अर्ज दाखल

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. सुरेश वरपुडकर, मा. आ. सुरेश देशमुख, आ. मेघना बोर्डीकर, बँकेचे संचालक अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

जिल्हा बँकेच्या शेतकी भवनात भाजपच्या आ. मेघना बोर्डीकर यांनी सकाळी समर्थकांसह अर्ज दाखल केला. दुपारी पावणे ३ वाजता आमदार वरपुडकर, मा. आ. देशमुख, अ‍ॅड. परिहार, वाघमारे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी सुशील देशमुख, गुलमीर खान, सचिन अंबिलवादे, नदीम इनामदार, संतोष बोबडे पाटील, श्रीधरराव देशमुख, बाळासाहेब फुलारी, मिलींद सावंत, अ‍ॅड. सिध्दार्थ भालेराव, शुभम् जाधव, पंजाबराव देशमुख, सुमीत परिहार, आदी उपस्थित होते. दरम्यान, ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांच्या स्नूषा रूपाली गोरेगावकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.