सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

विषारी औषध पिऊन आत्महत्या...

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

विजय कुलकर्णी / परभणी : मुल होत नाही तसेच दवाखान्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये घेऊन ये, या मागणीसाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या मानसिक व शारिरीक छळास कंटाळून विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील मोहपुरी येथे शनिवारी घडली.

या प्रकरणी गोविंद भरकड यांच्या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पतीसह सास-यास अटक केली आहे. सासू मात्र अद्याप फरार आहे. गोविंदराव भरकड यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांची मुलगी प्रमीला हिचा विवाह सहा वर्षापुर्वी प्रल्हाद तायनाथ (रा.मोहपुरी ता.जि. परभणी) यांच्यासोबत झाला होता. तेव्हापासून ती सासरी नांदत होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून पती प्रल्हाद तायनाथ, सासरा बालासाहेब तायनाथ व सासू सुमनबाई तायनाथ हे तिला नेहमी पैशासाठी तगादा लावून शारीरिक व मानसीक त्रास देत शिविगाळ करत होते. शनिवार दि.६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास प्रमीला हिचा भाया राजू तायनाथ याने, प्रमीलाला परभणीच्या सरकारी दवाखान्यात आणले आहे. ती काहीच बोलत नसल्याचे मोबाईल वरून कळवले. माहिती मिळताच आपण नातेवाईकांसह खासगी वाहनाने शासकीय रुग्णालयात आलो. तेथे मुलीस पाहिले असता ती मृत्यू पावली होती. माझी मुलगी प्रमीला ही सासरी नांदत असताना तिला मागील तीन वर्षांपासून पतीसह सासू-सास-याने तुला मुलबाळ होत नाही, दवाखान्यासाठी माहेराहून उपचारासाठी ५० हजार रुपये घेऊन ये असा तगादा लावून शारीरिक व मानसीक त्रास देऊन नेहमीच शिवीगाळ करत होते. याच छळास कंटाळून प्रमिलाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येस पतीसह सासू व सासरे कारणीभूत असल्याचे नमूद केले आहे.
गोविंदराव भरकड यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भगवान जाधव हे अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात पती व सास-यास अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांनी दिली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.