एचआरसी संस्थेने केला एचआयव्ही संक्रमित अनाथ युवकांचा सामूहिक विवाह

होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेने स्वेच्छेने पालकत्व स्वीकाराले

एचआरसी संस्थेने केला एचआयव्ही संक्रमित अनाथ युवकांचा सामूहिक विवाह

विजय कुलकर्णी/ परभणी : हॅपी इंडियन व्हिलेज प्रकल्प हसेगाव लातूर येथे चार विवाहयोग्य अनाथ जोडप्यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार पार पडला.

या विवाहात एका मुलीचे कन्यादान तसेच पालकत्व व इतर जोडप्यांच्या आहेर व रुखवताचा खर्च परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज एचएआरसी संस्थेने स्वीकारुन लोकसहभागातून या जोडप्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू जसे पलंग, गादी, उशी, सिंगल मिरर स्टील कपाट, नवरदेव व नवरीसाठी पोशाख, दागिने, आदी वस्तु दिल्या. सेवक संस्था सेवालय प्रकल्प हसेगाव लातूर येथे ६६ एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ मुलांचा सांभाळ संस्थापक रवी बापटले यांच्या देखरेखीखाली केला जातो. याच मुलांचे २०१४ पासून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेने स्वेच्छेने पालकत्व स्वीकारून या मुलांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन आदी विषयावर वेळोवेळी लोकसहभागातून मदत केली जाते. याच प्रकल्पातील काही मुले, मुली विवाहयोग्य झाली. शिवाय स्वतःच्या पायावर ऊभीही राहीली. विवाहयोग्य झाली.

या पूर्वी मे २०१९ मध्ये देखील एचएआरसी संस्थेतर्फे ३ अनाथ जोडप्यांच्या विवाहानिमित्त पालकत्व स्वीकारून विवाह, रुखवताचा संपूर्ण खर्च करून कन्यादान केले होते. रविवारी हॅपी इंडियन व्हिलेज प्रकल्प हसेगाव लातूर येथे चार विवाहयोग्य अनाथ जोडप्यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव प्रा. माधव बावगे यांनी चार जोडप्यांना शपथ देऊन त्यांना लगेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुपूर्द केले. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यात चार वधू व चार वर यांचे पालक म्हणून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व दाते उपस्थित होते. या विवाहात एका मुलीचे कन्यादान तसेच पालकत्व व इतर जोडप्यांच्या आहेर व रुखवताचा खर्च होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी संस्था) परभणीने स्वीकारुन लोकसहभागातून या जोडप्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू याबरोबर नवीन जोडप्यांना आशीर्वाद दिला. या सोहळ्या निमित्त सेवालय संस्थापक रवी बापटले, लातूरचे पोलीस उपअधीक्षक नवले, कृष्णा महाडिक, संपादक जयश्री खाडिलकर, डॉ. कणीरे, राजेंद्र कदम, डॉ. संध्या वारद, राचोटी स्वामी, प्रा. महारुद्र मंगनाळे आदी उपस्थित होते. एचएआरसी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून डॉ. पवन चांडक यांनी कन्यादान करून जोडप्यांना आशीर्वाद दिला. या प्रसंगी परभणी, लातूर व हसेगाव येथील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सामूहिक विवाहानिमित्त परभणीतून एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ. महेश अवचट, राजेश्वर वासलवार, चंद्रकांत अमिलकंठवार, अर्जुन पवार उपस्थित होते. या विवाहासाठी एचएआरसी संस्था परभणी व सेवालय परिवार हासेगाव लातूरच्या सर्व सदस्यांनी प्रयन केले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.