बंगळूरूः दक्षिण भारतातील कर्नाटकात असणाऱ्या शिवमोगा जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. स्फोटकांनी भरलेल्या एका ट्रकमध्ये हा स्फोट झाला. या अपघातात ८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचे स्वरुप इतके मोठे होते, की आजुबाजूच्या परिसरातही याचा हादरा जाणवला. इतकेच नव्हे तर, या शक्तिशाली स्फोटामुळे रोडलाही भेगा पडल्या. कर्नाटकची राजधानी असणाऱ्या बंगळुरू येथून ३५०किमी अंतरावर असणाऱ्या शिवमोगा इथे ही घटना घडली. जवळच्या परिसरात असणाऱ्या घरांच्या आणि कार्यालयांच्या काचाही या स्फोटच्या हादऱ्यामुळे फुटल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. कर्नाटक सरकारने पीडितांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देत असल्याचे म्हटले. स्फोटके ट्रकमध्ये होते, की ट्रकच्या बाजुला याचा शोध अद्याप सुरू असल्याचे प्रताप रेड्डी यांनी सांगितले.
Pained by the loss of lives in Shivamogga. Condolences to the bereaved families. Praying that the injured recover soon. The State Government is providing all possible assistance to the affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 22, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही काही डायनामाईट संपूर्णत: निष्क्रीय झालेले नाहीत. यासाठी पोलिसांनी बॉम्ब स्कॉडचीही मदत घेतली जात आहे. तसेच स्फोट झालेला संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे.