बेपत्ता मुलीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे

प्रहार जनशक्ती पक्षाच्या मध्यस्थीने सुटले उपोषण...

बेपत्ता मुलीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे

विजय कुलकर्णी / परभणी : जिल्ह्यातील जवळा बाजार येथील एका इसमाची विवाहित मुलगी परभणी येथून नोव्हेंबर २०२० पासून बेपत्ता होती. मात्र तपास लागत नसल्याने मुलीचे वडील २६ जानेवारी पासून परभणीत उपोषणास बसले होते. प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन पोलीस अधीक्षकांशी बोलणी केल्यावर या बेपत्ता विवाहितेचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग केल्याचे लेखी पत्र मुलीच्या पालकांना देण्यात आले आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील तुकाराम हरिभाऊ गरुड यांची विवाहित मुलगी वैष्णवी सतीश चव्हाण ही ३० नोव्हेंबरपासून बेपत्ता आहे. याबाबत परभणीतील मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. मागील दिड महिन्यापासून मुलीचा शोध लागत नसल्याने पालक हवालदिल झाले होते. या घटनेचा तपास विशेष यंत्रणेकडे द्यावा, या मागणीसाठी ते २६ जानेवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात उपोषणास बसले होते. सलग ३ दिवसांपासून उपोषण सुरु असल्यामुळे त्यांची तब्यत खालावली. त्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात भरती केले होते. याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवलिंग बोधणे व गजानन चोपडे यांनी मध्यस्थी करत पोलीस अधीक्षक व जिल्हधिका-यांची भेट घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याचे पत्र गरूड यांना दिले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.