विजय कुलकर्णी/परभणी:शहरातील वांगी रोडभागातील हर्षनगरातून एक महिला बेपत्ता झाली होती. या प्रकरणी नातेवाईक मिलिंद आनंदराव घुसळे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. ही महिला औरंगाबाद येथे सापडली आहे.
शहरातील हर्षनगर वांगी रोड परिसरातील सुशिलाबाई आनंदराव घुसळे (६०) या २७ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता बाहेर जाऊन येते, असे सांगून घरातून बाहेर पडल्या. मात्र त्या घरी परतल्या नव्हत्या. त्यावरुन पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, औरंगाबाद येथे ही महिला शनिवार, ३० जानेवारी रोजी नातेवाईकांना भेटली आहे.