माधव पिटले/ निलंगा : येणाऱ्या काळात शासनाकडून येणारा आमदार निधी हा फक्त शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून शेत रस्त्यासाठीच खर्च केला जाईल अशी माहिती आढावा बैठकीत औशाचे आ. अभिमन्यु पवार यांनी दिली.तसेच औसा मतदार संघात पाचशे किलोमीटरचे पाणंद रस्ते करण्यात येणार आहेत.
या आढावा बैठकीला निलंगा प.स.सभापती राधा बिराजदार, माजी सभापती अजित माने, प.स.सदस्य रमेश जाधव माधव इंगळे महेश देशमुख, जिलानी बागवान, करीबस्वेश्वर पाटील, नायब तहसिलदार नितीन महापुरे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, बांधकाम उप अभियंता गंगथडे, यांच्यासह लोकप्रतिनीधी व सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
औसा मतदार संघातील सर्वच पाणंद रस्ते यापुढे राहणार नाहीत त्यांना भरीव निधी आणून ते पूर्ण केले जातील तसेच येणाऱ्या तीन वर्षात एकही पाणंद रस्ता राहणार नाही आणि ठेवला जाणार नाही असे सांगण्यात आले आहे. जास्तीत जास्त प्रस्ताव अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवावेत अशा सुचना आ.पवार यानी केल्या. तसेच नरेगाच्या माध्यमातून शंभर टक्के शोष खड्डे करण्याच्याही सुचना दिल्या घर तेथे शोष खड्डा ही योजना यशस्वी करा व नरेगा मधूनच प्रत्येक शेतकऱ्यांना समान न्याय मिळेल व एकही शेतकरी या योजने पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या तसेच जनावरांचा गोठा शेततळे फळबाग लागवड याही योजना नरेगाच्या माध्यमातून पूर्ण करायच्या आहेत असे माहिती आ.पवार यांनी दिली.
संपूर्ण राज्यात औसाचे आ. अभिमन्यु पवार यांनी आमदार निधी हा शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यासाठी वापरला आहे.आणि येणाऱ्या काळातील तीन वर्षाचा विकास निधी हा पाणंद रस्त्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आ.अभिमन्यु पवार यानी दिली.