मुबंई : आगामी महापालिका निवडणूकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. काल शिवसेने पाठोपाठ आज भाजपनेनही मनसेला मोठा दणका दिला आहे. कल्याण डोबिलीवलीचे मनसेचे माजी विरोधीपक्षनेते, गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आणि माजी मंत्री आ. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश केला.
मंदार हळबे हे आतापर्यंत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर मागील विधानसभा निवडणुकीत मनसेकडून डोंबिवली मतदारसंघाचं तिकीट हळबेंना देण्यात आलं होती. त्यात त्यांचा ३७ हजार मतांनी पराभव झाला होता.
**आ. राजु पाटील यांची कृष्णकुंजवर धाव **
कल्याण डोंबिवलीत मनसेला गळती लागल्यानंतर पक्षाच्या एकमेव आमदाराने कृष्णकुंजवर धाव घेतली. राजेश कदम आणि मंदार हळबे यांच्या पक्षांतरानंतर मनसे नेत्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण पसरल्याचं दिसत आहे.