परभणी : मानवत तालुक्यातील मनसेच्या अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करीत प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या उपस्थित प्रवेश केला.
मानवत येथे झालेल्या कार्यक्रमात हा प्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी मानवत मनसेचे माजी तालुकाध्यक्ष भास्कर तारे यांच्या नेतृत्वात मंगरूळ ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य सतीश देशमुख, सदस्य अशोक मगर,भास्कर तारे, गोविंद मगर,गोविंद होंडे,बबन खरात,बालाजी होंडे,सतीश तारे,सचिन होंडे,दत्ता तीर्थे,नामदेव खरले,अर्जुन तारे,लिंबाजी उगले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने,गजानन चोपडे,नारायण ढगे,पिंटू कदम,माणिक दहिवाल,भास्कर खूपसे व बाळा नरवाडे आदी उपस्थित होते.