मनसे-शिवसेना वाद चव्हाट्यावर

ट्विटरवर मनसेचे संदीप देशंपाडे व युवासेनेचे वरूण सरदेसाई आमने-सामने

मनसे-शिवसेना वाद चव्हाट्यावर

मुंबई : मनसेचे सरचिटणीस संदीप देशंपाडे यांनी शिवसेनेचा उल्लेख विरप्पन गॅंग असा केला. त्यावर युवासेनेचे वरूण सरदेसाई यांनी पलटवार करत. खरे वीरप्पन कोण, हे जनतेला चांगलंच माहिती आहे. आपल्याला पण माहिती करून घ्यायचं असेल, तर मनसे खंडणी असं फक्त गुगल सर्च करून बघा. पहिल्याच पेजवर या बातम्या सापडतील. सगळ्या बातम्या वेगवेगळ्या असल्या, तरी प्रत्येक जिल्ह्यात यांची स्टोरी सेम टू सेम, असं ट्विट करत सरदेसाई यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

दरम्यान वरुण सरदेसाई यांच्या या ट्विटला संदीप देशपांडे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. मी वीरप्पनबद्दल बोललो होतो, वरुणला का झोंबलं माहिती नाही, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.