मनसेला खिंडार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

मनसेला खिंडार

मुंबई : महापालिका निवडणूकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे प्रदेशउपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खा.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेचे कल्याण तालुक्यातील माजी अध्यक्ष अर्जुन पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी सेना पदाधिकारी सागर जेधे यांच्यासह अनेकांनी सेनेत प्रवेश केला.

कोण आहेत राजेश कदम

कल्याण डेंबिवली मनसेचे संस्थापक सदस्य ते शहराध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष असा त्याचा प्रवास राजेश कदम यांनी २००९ मध्ये डोंबिवली विधानसभा निवडणूक लढविली होती. २०१५ मध्ये महापालिका निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावलं होतं, मात्र त्यांचा पराभव झाला होता.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.