मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही-खा.बाळू धानोरकर

महाराष्ट्रातील काॅग्रेसचे एकमेव खासदार बाळा धानोरकर यांचे थेट पंतप्रधान मोदींना आवाहन

मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही-खा.बाळू धानोरकर

नागुपर :महाराष्ट्रातील काॅग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पतंप्रधान मोदी यांच्याविरोधात निवडणुक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाने मला आदेश दिला तर पंतप्रधान मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खा. धानोरकर यांनी दिला आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे आज काँग्रेसच्या वतीने नागपुरात राजभवनावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी खा.धानोरकर बोलत होते.

**कोण आहेत धानोरकर **

  • बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत.

  • लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

  • चंद्रपूर मतदारसंघात त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.