एम. एस हुलसूरकर/हुलसूर: मुलीची किडनी खराब झाल्याचे दुःख सहन न झाल्याने आईने आत्महत्या केल्याची घटना हुलसूर येथे घडली. हुलसूर येथील कस्तुराबाई नरसिंहराव जिवाई वय (६५) दि.२२ शुक्रवारी पहाटे ६ वा. विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
अधिक माहिती अशी की, कस्तुराबाई यांच्या मोठया मुलीची किडनी खराब झाली होती. माझी मुलगी मृत्यूच्या दारात आहे. ती आता वाचू शकणार नाही. तिला डोळ्यासमोर मरताना बघू शकत नाही. हेच दु:ख सहन न झाल्याने घराच्या बाजूला असलेल्या विहिरीत उडी घेऊन कस्तुराबाई यांनी आत्महत्या केली. घटनास्थळी हुलसूर पोलीस स्टेशनचे पीएसआय यांनी पंचनामा करून शिबंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुलसूर सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली असा परिवार आहे