कापुस प्रक्रिया उद्योगासाठी खासदारांनी वेधले संसदेचे लक्ष

परभणीत कापुस प्रक्रिया केंद्र उभे रहावे

कापुस प्रक्रिया उद्योगासाठी खासदारांनी वेधले संसदेचे लक्ष

विजय कुलकर्णी/ परभणी : जिल्ह्यातील प्रमुख आणि नगदी पीक असलेल्या कापसावर प्रक्रिया
करणारे उद्योग सुरु करण्याची मागणी करत परभणीत कापुस प्रक्रिया केंद्र उभे रहावे या प्रश्नावर खासदार संजय जाधव यांनी संसदेचे लक्ष वेधले.

लोकसभेत बोलताना खा. जाधव म्हणाले, परभणी जिल्ह्यात प्रमुख पीक कापसाचे आहे. अनेक शेतकरी कापसाची लागवड करतात. या पिकावरच शेतकऱ्यांचा ऊदरनिर्वाह अवलंबुन आहे. परंतु परभणीत औद्योगिक उदासिनता असल्याने कापसावरील मालाच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांना परराज्यावर अवलंबून राहावे लागते. दरम्यान कापसाच्या एका गाठीत ३० लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार देण्याची क्षमता असते. परभणी जिल्ह्यात हजारो कापसाच्या गाठींची निर्मिती होते. कापसावर याच ठिकाणी प्रक्रिया झाली तर अनेकांना रोजगार मिळू शकतो. कापसाचे अर्थकारण हे झाकोळले जात आहे. अ‍ॅडव्हान्टेज परभणीच्या निमित्ताने ते समोर यावे, कापूस प्रक्रिया उद्योग उभे राहीले तरच परभणीच्या पदरात अ‍ॅडव्हान्टेज पडू शकेल अशी भूमिका खा. जाधव यांनी संसदेत मांडली.

कापूस हे परभणी जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक आहे. मराठवाड्याचे अर्थकारण यावर अवलंबुन आहे. कापूस एकाधिकार योजना लागू झाल्यानंतर काहीकाळ त्यातून फायदा मिळाला. परंतु, खुले आर्थिक धोरण आणि जागतिकीकरणाच्या वादळापुढे एकाधिकार योजना कोलमडून पडली. शेतकऱ्यांना बाजारपेठेत अधिक दर मिळू लागले. कधी जागतिक मंदीचा फटकाही सहन करावा लागला. त्याच कालावधीत कापूस ते कापड ही योजना अंमलात आणली असती तर जागतिक मंदीच्या फटक्यातून शेतकरी सावरला असता. परंतु, ज्या उद्देशाने एकाधिकार योजना आणली तो उद्देश काही सफल झाला नाही. आज तो कायदाच विकासाच्या आड येऊ घातला आहे. योजना गुंडाळली पण कायद्याचे भूत अद्यापही मानगुटीवर बसले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात किमान कापुस प्रक्रीया उद्योग उभारावा अशी मागणी खा. जाधव यांनी लावुन धरली आहे. त्यामुळे परभणी लोकसभा क्षेत्रात कॉटन प्रोसेस इंडस्ट्री उभारावी अशी मागणी त्यांनी केली आहे. कापसासाठी परभणीकरांना तामिळनाडू सह ईतर राज्यातील उद्योग प्रक्रीयेवर अवलंबुन राहावे लागत आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात कापुस प्रक्रीया उद्योग उभारला तर शेतकरी व बेरोजगारांचा प्रश्न मिटेल असेही ते म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.