विजय कुलकर्णी/परभणी : शहर भाजपच्या वतीने राज्यात महावितरणने राज्यातील ७५ लक्ष वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून राज्यातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले आहे. याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महावितरण कार्यालयास टाळे लावले.
यावेळी आंदोलनात परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, मोहन कुलकर्णी, प्रमोद वाकोडकर, अँड. एन. डी. देशमुख, जि. प. सदस्य राजेश देशमुख, मनपा सदस्य मधुकर गव्हाणे, सुनिल देशमुख, दिनेश नरवाडकर, तालुकाध्यक्ष संदिप जाधव, प्रभावती अन्नपुर्वे, विजय गायकवाड, संजय कुलकर्णी अँड. गणेश जाधव, संतोष जाधव, माधवी घोडके, प्रदिप तांदळे, मंडळाध्यक्ष सुहास डहाळे, सुरेश भुमरे, रामदास पवार, भालचंद्र गोरे, संतोष सोनवणे, सुप्रिया कुलकर्णी, सोनाली सुर्यवंशी, विजया कातकडे, पुनम शर्मा, अब्दुल खालेद, सिंकदर खान, कामगार आघाडी प्रमुख रोहित जगदाळे, राहुल संघई, वैभव शिंदे, आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.